मैने प्यार किया पाहिल्यानंतर कोलापूरचे एजाज अहमद दिग्दर्शक

 
हिंदी चित्रपटासाठी सोलापूरचे नाव घेतले की एक्टर व दिग्दर्शक "एजाज़ अहमद" यांचे नाव आवरजुण घेतले जाते.

पानगल प्रशालेतुन शालेय शिक्षण घेऊन सोशल महाविद्यालयतुन  एम.ए केल्यानंतर पत्रकारीतेची पदवी मिळवीली.

पुढे त्यांनी अड फिल्म्समधून करिअरला सुरुवात केली. 

सोलापुरात छोटे छोटे चित्रपट बनविण्याची सुरवात एजाज़ अहमदनेच केली. बालपणीत  " मैने प्यार किया" हा चित्रपट पाहून दिग्दर्शक बनण्याचे मनात ठरविले. मिडल क्लास फॅमिली मध्ये जन्मलेल्या या मुलाला तशी संधी फारच कमी होती. वडिलांची इच्छा होती की त्यांनी रेल्वेत नोकरी करावी, पण नोकरी न करण्याच्या निर्णयावर तो ठाम होता आणि यात त्याची साथ दिली त्याच्या मोठ्या बहिणीने. कॉलेजमधील मित्रांना सुद्धा त्याच्या या दिग्दर्शनाची आवड ची जाण होती व ते सतत त्याला प्रोत्साहित करीत असत. सोलापुरात रेडिमेड कापडाचे दुकान व्यवस्थित चालत होते पण एजाज़ अहमद यांच्या मनात वेगळेच काहीतरी चालत होतं. मोठ्या बहिणीने हे ओळखून त्याला पुण्याला बोलावून घेतले व तेथेच चित्रपट दिग्दर्शनाचे शिक्षण घेण्यास मदत केली. पुढे एजाज़ अहमद यांनी मॅट्रिक्स मीडिया या कंपनीची स्थापना केली व या कंपनीमार्फत ॲड फिल्म व व्हिडीओ फिल्म बनवण्याचे सुरू केले. पुणे व सोलापूर च्या विविध ब्रँड साठी त्याने 400 पेक्षा जास्त जाहिरात पट बनविले आहे. हळूहळू एजाज़ अहमद याने दिग्दर्शनात फारच नाव कमविले व काही वर्षातच त्याने बॉलीवुड पर्यंत आपली ओळख निर्माण केली आणि बॉलीवूड चे मोठे हिंदी चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. आज एजाज़ अहमद ने आपल्या चित्रपटांच्या माध्यमातुन बॉलीवूडच नाही तर संपूर्ण देशभरातील चित्रपट रसिकांपर्यंत सोलापुराचे नाव पोहोचवले आहे. त्याचे चित्रपट सतत थियेटर किंवा टीवी चैनल वर पाहायला मिळतात. हु इज देअर?, लाईफ की ऐसी की तैसी , एक थी अनामिका आणि अवंतिका सारख्या अनेक हींदी चित्रपटातून त्यांनी सोलापूरचे नाव बॉलिवूडमध्ये चमकीली आहे. प्रेस मिडिया अवाॅरङ(2016), छत्रपति शिवाजी महाराज गौरव पुरस्कार (2017), आणी दादा साहेब फाळके युथ आइकॉन पुरस्कार (2019) हे त्याला मिळालेले काही पुरस्कार। ऐक्टर,डायरेक्टर व सिंगर अशी ओळख त्याची जिद्द आणी मेहनतीच फळ आहे. 

सद्या तो स्वत:ची म्युजिक कंपनी सुरू करण्याच्या तयारीत व्सथ आहे।

सोलापूरच्या या धरती पुत्राला व त्याच्या चित्रपटांना मानसन्मानाने ओळखले जाते.

Post a Comment

0 Comments